esakal | विधानसभेला तौफिक शेख यांची झाली होती मदत ! प्रणिती शिंदेच्या गौप्यस्फोटाने राजकारणाला वेगळे वळण 
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde_Shaikh

तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात 2014 ची निवडणूक एमआयएमकडून लढत कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती, असं विधान करून कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

विधानसभेला तौफिक शेख यांची झाली होती मदत ! प्रणिती शिंदेच्या गौप्यस्फोटाने राजकारणाला वेगळे वळण 

sakal_logo
By
विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी 2014 मध्ये शहर मध्य विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणक लढवून काट्याची टक्कर दिली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने तौफिक शेख यांचा निवडणुकीतून पत्ता कट केला होता. मात्र त्या निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती, असे विधान कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी केले आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी नुकतंच राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक वाढवली आहे. त्यांच्या समर्थक नगरसेवकांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात 2014 ची निवडणूक एमआयएमकडून लढत कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती, असं विधान करून कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

एमआयएममधील नाराज तौफिक शेख यांनी शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्याविरुद्ध उघड नाराजी व्यक्त करत एमआयएमला सोडचिठ्ठी दिली. तौफिक शेख हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी नेते आहेत. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या एकेकाळचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तौफिक शेख यांची मदत विधानसभा निवडणुकीत झाली, असं विधान करून सोलापूरच्या राजकारणाला एक नवे वळण दिलं आहे. अवघ्या एका वर्षावर सोलापूर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना भविष्यात प्रणिती शिंदे आणि तौफिक शेख एकत्र तर येणार नाहीत ना, अशा चर्चांना आता ऊत आला आहे. 

याबाबत पत्रकारांनी तौफिक शेख यांना डिवचले असता, ते म्हणाले, सोलापूरच्या विकासासाठी आम्ही अजितदादा, शरद पवार व प्रणिती शिंदे या सर्वांच्याच संपर्कात आहोत. जो पक्ष आमची कामे करेल, त्यांच्यासोबत जाणार आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल