Praniti Shinde: जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच मी खासदार: प्रणिती शिंदे, २४ गावांचा पाणीप्रश्न साेडवणार..
मंगळवेढ्यातील २४ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खासगी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गोणेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा विकास करण्यासाठी चेन्नई येथील खासगी संस्थेमार्फत काम सुरू केले आहे तसेच जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच मी खासदार झाले आहे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.