

Praniti Shinde Warns Maharashtra Government of Farmers Road Block Protest Over Two Hour Power Supply at Ashti Irrigation Project
esakal
मोहोळ: आष्टी मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असूनही, शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता आष्टी मध्यम प्रकल्प परिसरातील विद्युत पुरवठा महावितरणने केवळ दोन तास सुरू ठेवला आहे. हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. मी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहे, येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा किमान 5 तास करावा या मागणीची दखल न घेतल्यास शेतकऱ्यासह रास्ता रोको करणारा असून, सर्वांच्या पुढे मी असेन भले माझी गोळ्या झेलण्याची तयारी आहे असा इशारा सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.