
मंगळवेढा : शहरातील विविध विकास कामासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेल्या रस्ते व गटार या कामाकरिता 3.98 कोटी मंजूर झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख प्रतिक किल्लेदार यांनी दिली.
मंजूर कामांमध्ये सांगोला नाका ते बोराळे नाका या रस्त्याचे काम महत्त्वपूर्ण मानले जाते कारण या कामासाठी शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. या कामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय टळणार आहे.
राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे गटाची जबाबदारी या शहरातील प्रतीक किल्लेदार या उद्योगमुख तरुणाकडे आली. त्यामुळे मंजूर झालेला हा निधी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाला नगरपालिकेत प्रवेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या निधीमधून शहरातील सांगोला नाका ते बोराळे नाका रस्ते व गटार करणे 2.25 लाख, हजारे गल्ली धर्मशाळा ते प्रवीण हजारे रस्ता डांबरीकरण करणे 22 लाख,
गजानन उन्हाळे घर ते केशव पडवळे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख,दिगंबर यादव ते सांगोला नाका रस्ता 20 लाख, चंद्रकांत पवार घर ते प्रकाश नलवडे शौचालयासमोर रस्ता करणे 20 लाख, सुरवसे अॅटो बोळ ते मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार करणे 19 लाख, पटवर्धन वकील ते बाळासाहेब जाधव घर रस्ता करणे 19 लाख
अशोक लेंडवे घर ते बळीराजा बँक काँक्रिटीकरण करणे 10 लाख, बबन चव्हाण घर ते सांगोला रोड गटार बांधणे 16 लाख, कल्याण प्रभू ते नागणेवाडी नगरपालिका हद्द रस्ता 24 लाख, चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता डांबरीकरण करणे 12 लाख, ढाणे घर ते महादेव मंदिर रस्ता व गटार 10 लाख, टीकाचार्य मंदिर ते लोकमंगल सभागृह बोळ काँक्रीट करण करणे व समाधान हेंबाडे घर ते लक्ष्मण सावंजी घर 10लाख
वरील सर्व कामे मंजूर झालेले असून लवकरात लवकर सर्व कामांची निविदा प्रसिद्धी करून सर्व कामे चांगल्या दर्जाचे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सदर निधी मंजूर करण्यासाठी आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत, ना. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मा.आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे यांचे सहकार्य लाभल्याचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार यांनी सांगितले.
शहरातील पर्यटन वाढीसाठी विशेषतः भुईकोट किल्ला,कृष्ण तलाव सुशोभीकरण, बसवेश्वर स्मारक चोकोबा स्मारक आदी प्रश्नाची सोडवणूक करावी या मागणीसाठी आरोग्यमंत्र्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
- प्रतिक किल्लेदार शहराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.