
सोलापूर: मुंबई, पुणे, नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथी महापालिका सोलापूरमध्ये तयार झाली. अवघ्या विश्वाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे सानिध्य या जिल्ह्याला लाभले असून विकासाची अचूक दिशा मिळाल्यास सोलापूरचा विकास होणे कठीण नाही. योग्य व्हीजन असलेले दहा उद्योजक जरी या शहरात तयार झाले तरी ते या शहराचा चेहरामोहरा बदलतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी व्यक्त केले.