
सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शाई फासून धक्काबुक्की करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील कलमांनुसार संशयितांना अटक होऊ शकत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गुन्ह्यातील सातपैकी दीपक काटे व भवानेश्वर शिरगिरे (दोघेही रा. इंदापूर) हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. उद्या (मंगळवारी) त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अपर पोलिस अधीक्षकांसमोर हजर केले जाणार आहे. उर्वरित पाच संशयितांचा शोध सुरू आहे.