esakal | सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

प्रीती कैरमकोंडाला कॅनडाच्या टोरॅंटो शहरातील "केपीएमजी' या नामवंत कंपनीत नोकरीची संधी लाभली.

सोलापूर : मूळ सोलापूरची असलेल्या व विदेशात एमबीएचे शिक्षण घेतलेल्या प्रीती कैरमकोंडा (Preeti Kairamkonda) हिला कॅनडा (Canada) या देशाच्या टोरॅंटो (Toronto) शहरातील "केपीएमजी' या नामवंत कंपनीत नोकरीची संधी लाभली आहे. तिला वार्षिक एक कोटी रुपये पगाराची ऑफर आहे. तेलंगणातून तेलुगु भाषिक पद्मशाली समाजाने महाराष्ट्रातील सोलापुरात येऊन मराठी भाषेला आपलंसं केलं. शहरातील पूर्व भागात विविध उद्योग-व्यवसायात नावलौकिक मिळवला. पद्मशाली समाजातील अनेक युवक शासकीय नोकऱ्यांसह मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आता पद्मशाली समाजाच्या (Padmashali Community) या कन्येला मिळालेली विदेशी कंपनीची ऑफर सोलापूरच्या पूर्वभागासाठी अभिमानास्पद आहे. (Preeti Kairamkonda got a job abroad with a salary of one crore in Canada-ssd73)

हेही वाचा: "ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावली..!'

प्रीतीचे वडील व्यंकटेश कैरमकोंडा हे मूळ सोलापूरचे. श्री. कैरमकोंडा हे विद्युत अभियंता आहेत. टाटा कन्सल्टिंगमध्ये नोकरी करत असताना त्यांना जपान, अबुधाबी येथे कामाची संधी मिळाली. नंतर त्यांनी रिसर्च करीत एका इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाचा शोध लावला. आशिया खंडात हे उत्पादन कोणीच बनवत नसल्याने त्यांनी भारतात परतून सोलापुरात फॅक्‍टरी टाकण्याचा संकल्प केला. याकरिता ते सहकुटुंब भारतात परतले. दरम्यान, कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची ऑफर मोठ्या प्रमाणात आल्याने ते सध्या याच कामासाठी मुंबईत स्थायिक आहेत.

हेही वाचा: विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा! परराज्यातील विद्यार्थ्यांची झाली सोय

त्यांची कन्या प्रीती हिचा जन्म सोलापुरात झाला. वडिलांच्या नोकरीदरम्यान ती अबुधाबीत चौथीपर्यंत शिकली. नंतर बदलीनंतर टोरॅंटो येथे गेले. प्रीतीचे पुढील शालेय शिक्षण टोरॅंटोत झाले. वडिलांनी नोकरी सोडून मायदेशात परतल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदवी घेतली. त्यानंतर मुंबईत झायकस या विदेशी कंपनीत नोकरी करत असताना तिला अमेरिका (America), ब्राझील (Brazil), मेक्‍सिकोमध्ये (Mexico) कंपनीतर्फे कामाची संधी मिळाली. नंतर तिने टोरॅंटोच्या रोटमॅन बिझनेस स्कूलमध्ये 2019 मध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण झाले असून, तिला एका वर्षापूर्वीच कॅनडा देशातील टोरॅंटो शहरात "केपीएमजी' या नामवंत कंपनीत वार्षिक सुमारे एक कोटी रुपये (वार्षिक दीड लाख कॅनेडियन डॉलर) पगाराच्या नोकरीची ऑफर आली. येत्या सप्टेंबरपासून ती या कंपनीत रुजू होणार आहे. ती फार कष्टाळू व अभ्यासू असून तिच्यात उत्कृष्ट संभाषणकला व व्यावसायिक दृष्टिकोन असल्याचे तिचे वडील अभिमानाने सांगतात. तिला अरेबिक, फ्रेंच, जर्मनी, मराठी, तेलुगु, हिंदी, इंग्लिश भाषा अवगत असून कॅनेडियन व अमेरिकेची बोलीभाषा उत्तम येते.

माझी मुलगी प्रीती हिने मोठ्या कष्टाने विदेशात एमबीए केले. ती सप्टेंबरपासून टोरॅंटोमधील केपीएमजी या नामवंत कंपनीत नोकरी करणार आहे. पुढे सीईओ व्हायचे तिचे स्वप्न आहे.

- व्यंकटेश कैरमकोंडा, प्रीतीचे वडील

loading image