मोहोळ - देशातील आदिवासी व पारधी समाजाच्या विकासासाठी ठरविण्यात येणाऱ्या धोरणामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी व होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रपतींनी देशातील 56 जणांना सोमवार ता. 18 ऑगस्ट रोजी आमंत्रीत केले असून, त्यात मोहोळ येथील ज्ञानेश्वर भोसले यांना ही आमंत्रित करण्यात आले आहे, तशा आशयाचे लेखी पत्र राष्ट्रपती भवनाकडून भोसले यांना 12 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे.