
सोलापूर: ‘गोष्ट पैशापाण्याची’ या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक, वक्ते आणि उद्योजक प्रफुल्ल वानखेडे हे सोलापूरकरांच्या भेटीला येत आहेत. ‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (ता. २५) सायंकाळी ५.३० वाजता रेल्वे ऑफिसर्स क्लबमध्ये ‘शतकातील पंचविशी आणि तरुणाईसाठी नवी संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.