सोलापूर : यावर्षी हुरड्याची आवक बाजारात सुरू झाली असून तब्बल ५०० रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहेत. अतिवृष्टीने या वर्षीचा हंगाम विस्कळित झाला असून, संक्रांतीनंतरच हुरड्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी थंडी सुरू झाली की हुरडा हंगामाचे वेध लागतात. यावर्षी देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हुरडा दाखल झाला आहे. जादा पावसाचा फटका बसल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने हुरड्याचे भाव गगनाला भिडले आहेत.