
सोलापूर: पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर ते ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत लॉजिस्टिक विभागाने व्यूहात्मक दळणवळणामध्ये मोलाची कामगिरी बजावली. याची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने कार्यकारी संचालक सुशील गायकवाड व सहकारी राकेश खत्री यांना १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कमेंडेशन पदक जाहीर केले आहे.