
सोलापूर : घरात चारवेळा मुख्यमंत्री, पाचवेळा उपमुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि आता पक्ष फुटला तरी घरात तीन खासदार, अशांसोबत माझी लढत झाली. माझ्या किमतीपेक्षा त्यांची किंमत अवघ्या ६२२ मतांनी जास्त आहे. त्यांचा राजकारणाचा इतिहास ६० वर्षांचा आहे, आपले काय, असे सांगून येत्या २०२९ ला हे मार्जिन कव्हर करणार असल्याचा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.