
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : पूर्वीच्या काळी कीर्तनाने सात्विकता वाढत होती. परंतु आज सर्वच गोष्टी हद्दपार झाल्यामुळे पहिली पंचवीशी सांभाळली नाही तर पन्नाशीचा हिशोब लागणार नाही. त्यासाठी दारूची बाटली दूर करून दुधाची बाटली जवळ करण्यासाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धांची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.