Solapur News : कलावंतच जनतेचे प्रश्न मांडू शकतात प्राध्यापक सुरेश शिंदे

सध्याच्या परिस्थितीत अनेक नेते सत्तेसाठी कोणतेही पक्षात उड्या मारतात त्यामुळे जनतेचे प्रश्न तसेच राहतात
Professor Suresh Shinde statement artists raise public questions solapur
Professor Suresh Shinde statement artists raise public questions solapursakal

मंगळवेढा : सध्याच्या परिस्थितीत अनेक नेते सत्तेसाठी कोणतेही पक्षात उड्या मारतात त्यामुळे जनतेचे प्रश्न तसेच राहतात, नेते सर्व काही आलबेल असल्याचे सांगतात पण जनतेच्या प्रश्नांची जाणीव कलावंतच करून देतात आणि त्यांचे प्रश्न कलावंतच मांडू शकतात असे प्रतिपादन कवी प्रा.सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविसंमेलनात ते बोलत होते.कविसंमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, औदुबर वाडदेकर, भारत पाटील,हजरत काझी, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे,मनिषा सकट, प्राचार्य चिदानंद माळी, विश्वंभर काळे, कृष्णदेव चौगुले,

Professor Suresh Shinde statement artists raise public questions solapur
Solapur News : कन्नड व उर्दू शिक्षकांचे समायोजन होणार; शिक्षणाधिकारी संजय जावीर

कांतीलाल इरकर बसवराज कोरे, शशिधर पाटील दादासाहेब वाघमारे आधी उपस्थित होते.या कविसंमेलनात नारायण पुरी, अविनाश भारती, शिवाजी बंडगर,अनंत राऊत, खलील मोमीन, डी.के.शेख, नितीन चंदनशिवे,भरत दौंडकर ,शिवाजी सातपुते, रमजान मुल्ला, आणि तालीब सोलापूरी हे सहभागी झाले.

सूत्रसंचालन प्रा.सुरेश शिंदे व इंद्रजीत घुले यांनी केले. ओय साहेब लागू द्या पाय,अनुभव घ्यावा कशीय शेतीय या कवितेतून दुष्काळी भागातील शेतकय्राला शेती करतानाचा अनुभव आणि शासकीय उपाययोजनेचा कागदोपत्री अंमलबजावणीवर आधारीत खदलाबदली या कवितेतून शिवाजी बंडगर यांनी शेतकरी प्रश्नावर कवितेतून आवाज उठविला.

Professor Suresh Shinde statement artists raise public questions solapur
Solapur : स्थलांतरित पक्षी येतात उशिरा अन् जातात लवकर

आबा पाटील यांनी सध्याच्या राजकीय नेत्याच्या पक्षांतरावर नेम नाही आमचा नेता कुठल्या पक्षात हाणील उडी म्हणून आम्ही खिशात सगळे झेंडे ठेवले घालून घडी ही कविता सादर केली. तालीब सोलापूरी यांनी घरातील पत्नीच्या हुकूमशाहीवर मेरे आगे क्यो रोता है,आखो मे पानी मत लाना.इश्क मे मत जादा उचलना,हु बोलने क्या,और लेकर चलने क्या , तारे मंगेगी,तो सिदा घरको आणा रमजान मुल्ला यांनी अंतराच्या किंकाळीने बधीर झालो, बुका झालो गुलाल झालो अबीर झालो ,मला वाटले चोखोबा कबीर झाले.

Professor Suresh Shinde statement artists raise public questions solapur
Solapur News : बेघर निवारा केंद्रात स्वावलंबन, ध्यान अन् प्रार्थनेचे घुमताहेत सूर

शिवाजी सातपुते यांनी वात्रटिकेतून ईडी,सी.बी.आय, पक्षांतर याविषयी त्यांनी परखड मत मांडत कमळाच्या प्रत्येक पाकळीवर प्रभू श्रीरामाचे नाव आहे,विधानसभेकडून लोकसभेकडे लक्ष्मणाची धाव आहे या वात्रटिकेतून सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेवर लक्ष्मण ढोबळे हे लोकसभेसाठी दावेदार असल्याचे जाणीव करून दिली.नितीन चंदनशिवे यांनी हरवलेल्या प्रियकराची व अनेक पक्षाकडे फिरणाऱ्या नेत्याची अवस्था कवितेतून दाखवून दिली.तत्पुर्वी ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित नाटक वास इस दास ही नाटीका सादर करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com