
सोलापूर : जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आजपासून तीन दिवसाचा बंद पुकारत आंदोलनास सुरवात केली. आझाद मैदानावर सुरु झालेल्या या आंदोलनास जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी साथ देत आपले दवाखाने आज बंद ठेवले. यामध्ये महिला होमिओपॅथी महाविद्यालय बंदमध्ये सहभागी झाले होते. तसेच आपल्या मागणीचे शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या आंदोलनात सर्व प्राध्यापक व डॉक्टरांनी सहभाग घेतला.