
उ सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अगदी समोर बंद असलेल्या जकात नाक्याच्या इमारतीत राजरोस वेश्या व्यवसाय सुरू आहे. दररोज रात्री या भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांचा ग्राहक असा बाजार भरतो. हा प्रकार विद्यापीठाच्या समोरच सुरू असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर धोकादायक आहे.