
सांगोला : मंगल कार्यालयामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये दोन परप्रांतीय वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसह मंगल कार्यालयाचे मालक, एजंट व ग्राहक अशा पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सांगोला-वासूद रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल जवळील संभाजीनगरमधील समर्थ कृपा मंगल कार्यालय, सांगोला येथे ता. ९ रोजी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.
शहरातील संभाजी नगरमधील समर्थ कृपा मंगल कार्यालय येथे बेकायदेशीरपणे महिलांकडून वेश्या व्यावसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे मंगल कार्यालयामध्ये बोगस गिऱ्हाईक बनवून मंगल कार्यालयात पाठवून छाप्याचा सापळा रचला. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलिस फौजदार अशोक बाबर व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह समर्थ कृपा मंगल कार्यालयवर नियोजित छापा टाकला. या छाप्यामध्ये दोन परप्रांतीय महिलांनासह मंगल कार्यालयाचे मालक गणेश भगवान रामदासी (रा. संभाजीनगर, वासुद रोड, सांगोला), एजंट सैकत भोलानाथ पत्रा (रा. इक्बालपुर, पोलिस ठाणे चंदोकोना, जि. पश्चिम मेंदरापूर, पश्चिम बंगाल) व मिलिंद रेवन बनसोडे (रा. चिंचोली रोड, सांगोला) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद सहाय्यक पोलिस फौजदार अशोक दत्तात्रय बाबर (मंगळवेढा पोलिस ठाणे) यांनी दिली आहे आहे.
रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू
अक्कलकोट : रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेतून पडून जखमी होऊन एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती कर्नाटक राज्यातील सिंदगी तालुक्यातील आहे. ही घटना अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी शिवारातील रेल्वे रुळावर घडली. या घटनेची नोंद दक्षिण पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेची खबर रामन्ना भिमशा हरिजन (रा. आंदरी, ता. सिंदगी, जि. विजयपूर यांनी दक्षिण पोलिस ठाण्यात दिली आहे. चिदानंद शरणाप्पा बगलूर (वय ३७, रा. कल्लूर, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तपास अजय भोसले हे करीत आहेत.
विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
अक्कलकोट : तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करून व पीडिताच्या मुलास मारहाण केल्याने एकावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरात प्रवेश करून संशयित आरोपीने विनयभंग केला. त्यानंतर पीडिताच्या दोन्ही मुलास मारहाण करून त्यांच्या ताब्यातील चारचाकी कार मागे घेत असताना पीडिताच्या एका मुलास धक्का लागून तो जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.