‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील बंद पडलेल्या चादर, टॉवेल कारखान्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. तेथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यात चालक महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला एक दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
Solapur city police raid

Solapur city police raid

esakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील बंद पडलेल्या चादर, टॉवेल कारखान्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. तेथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यात चालक महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला एक दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत एक टॉवेल-चादर कारखाना चार-पाच वर्षांपूर्वी भावांच्या वादात बंद पडला होता. त्याठिकाणी अनुसया (वय ५७) नावाची महिला पतीसह वॉचमन म्हणून कामाला ठेवली होती. त्याठिकाणी मालकाचे कोणीच येत नसल्याने अनुसयाने त्या कारखान्यात कुंटणखानाच सुरू केला. ग्राहकाच्या पसंतीनुसार अनुसया परिसरातील महिलांना कारखान्यात बोलावून घेत होती. याची माहिती खबऱ्याकडून शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला पैसे देऊन त्याठिकाणी पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक स्नेहा म्हेतर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी अनुसया म्हणाली, ‘तेथील दोन महिला कोण आहेत, कोठून आल्या आहेत मला माहिती नाही.’ पण, पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे दिलेल्या नोटा अनुसयाकडे आढळल्या होत्या. शासकीय पंचासमक्ष पंचनामा करून पोलिसांनी अनुसयाला अटक केली. दोन पीडितांची सुटका केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक स्नेहल म्हेतर यांच्या नेतृत्वातील सहायक पोलिस उपनिरीक्षक रियाज प्यारे, अलका शहापुरे, हवालदार सत्तार पटेल, सीमा खोगरे, उषा मळगे, अरूणा परब, सविता म्हेत्रे, सुशीला नागरगोजे, अकिला नदाफ, चालक दादा गोरे यांच्या पथकाने केली.

अनुसयाचा मोबाईल साधाच, तरी...

चार-पाच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कारखान्यात वॉचमन म्हणून अनुसयाला कमीच पगार होती. त्यानंतर तिने त्याच कारखान्यात कुंटणखानाच सुरू केला. अनुसयाकडे साधाच मोबाईल होता, पण त्यात ग्राहक आणि महिलांचे बरेच नंबर आढळले आहेत. पोलिस निरीक्षक म्हेतर यासंदर्भातील अधिक तपास करीत आहेत. हा कारखाना आकाशवाणी केंद्रासमोरून जाणाऱ्या रोडवरील लोकवस्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com