

Citizens waiting at Madha tehsil office as record room remains closed, causing inconvenience.
sakal
उपळाई बुद्रूक: माढा तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागातील कर्मचारी जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी गेल्याच्या कारणामुळे हा विभाग तीन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील आलेल्या नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेकॉर्ड रूमच्या बाहेर प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेल्याने विभाग बंद असल्याचा फलक पाहून, निराश होऊन माघारी परतावे लागले. अनेक जण दूरवरून आले होते त्यांची अक्षरशः फरफट झाली.