

Star Airline Explores Solapur as Pune Slots Remain Unavailable
sakal
सोलापूर: सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई पाठोपाठ आता तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टार एअर कंपनीकडून चाचपणीही होत आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून तिरुपती विमानसेवा ही सोलापूर वन स्टॉप राहणार आहे. पुणे ते सोलापूर ते तिरुपती अशी सेवा असणार आहे, पण अद्याप पुणे विमानतळावर स्लॉटच मिळाला नाही.