निवडणूक ग्रामपंचायत नंदेश्वरची तर चर्चा पुण्यात अन्‌ पैजा मुंबईत ! 

grampanchayt
grampanchayt

पाठकळ (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यातील सर्वाधिक नेत्यांचे गाव म्हणून ज्याची ओळख आहे त्या नंदेश्वर गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या 13 असून, यामध्ये सद्य:स्थितीला 13 जागांसाठी 34 उमेदवार आपले नशीब निवडणुकीच्या माध्यमातून आजमावत आहेत. मात्र याची चर्चा नोकरी - व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या नंदेश्‍वर ग्रामस्थांमधून रंगत आहेत. पुणे येथे चर्चा तर मुंबई येथे कोण निवडून येणार, याबाबत पैजाही लागत असल्याचे दिसून येत आहे. 

नंदेश्वर ग्रामपंचायतीसाठी एकूण 67 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यामध्ये काहींनी भीतिपोटी तर काहींनी तडजोडीतून अर्ज माघारी घेतले व सरते शेवटी 67 पैकी 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये दोलतडे - जानकर गट व गरंडे असे दोन गट आमने - सामने आले असून, दुरंगी लढतीचे चित्र स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर एकूण आठ अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत सहभागी होऊन वेगळीच रंगत आणलेली आहे. 

सध्या नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे. विकासाचे मुद्दे पटवून देऊन नंदेश्वरचे खऱ्या अर्थाने नंदनवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार असल्याचेही दोन्ही बाजूचे उमेदवार मतदारांना पटवून देण्याचे अतोनात प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र हे सर्व होत असताना नोकरी - व्यवसायानिमित्त पुणे - मुंबई येथे स्थायिक झालेल्या नंदेश्‍वरच्या भूमिपुत्रांमध्ये मात्र "कोणाची पार्टी येणार' यावरून चर्चा पुण्यात जरी होत असली तरी त्याच्या पैजा मात्र याच गावातील भूमिपुत्रांनी मुंबईमध्ये लावलेल्या ऐकावयास मिळत आहेत. 

सर्वसाधारणपणे एकूण 13 जागांसाठी 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी 8 उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून सरतेशेवटी कोणाला पाठिंबा देणार? का शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर अपक्ष उमेदवार म्हणून ठाम राहणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सद्य:स्थितीला दोन्ही पॅनेलकडून प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरवात करून सोशल मीडियावरही जोरदार प्रचारबाजी चालू केलेली आहे; मात्र हे सर्व होत असताना पैजा लागणे हे काय नंदेश्वरसाठी नवीन नाही. परंतु लॉकडाउनमध्ये काही महिन्यांसाठी गावाकडे आलेले हे नंदेश्वरचे नागरिक नंतर लॉकडाउन काही अंशी शिथिल झाल्यानंतर आपल्या नोकरी - व्यवसायानिमित्त पुणे- मुंबईला गेलेल्या या युवकांनी आता लगेचच गावाकडे येणे शक्‍य नाही, म्हणून पुण्या-मुंबईमध्येच आपल्या गावाकडच्या मित्र - मैत्रिणींबरोबरच पैजा लावल्या असून, अखेरच्या मतदानाच्या दिवशी गावात येऊन मतदान करणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com