Solapur ATS Arrest
esakal
सोलापूर : पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने सोलापूरच्या जुबेर हंगरगेकर याला ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून अटक (Solapur ATS Arrest) केली आहे. त्याच्याकडे मशिन गन बनविण्याबद्दलची कागदपत्रे मिळाली आहेत. आतापर्यंत सोलापुरातील दोघांना ‘एटीएस’ने बोलावून त्यांच्याकडे तपास केला आहे. याशिवाय आणखी दोघांवर शहर पोलिसांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.