
pune : छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेरणादायी पुस्तकाचे सामुहिक वाचन
मांजरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहासाचे शालेय विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व धाडसी व आदर्श बनेल असे मत अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी व्यक्त केले
अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने के.के. घुले विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी तेजोमय सूर्याच्या आकारात बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी पुस्तकाचे सामुहिक वाचन केले. दरम्यान, यावेळी विद्यालयाच्या मैदानाच्या मध्यभागी ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विठ्ठल भापकर, पांडुरंग घुले, समीर घुले, शिवाजी घुले, राहुल घुले, सागर प्रभुणे, किशोर टिळेकर, अतुल रासकर यांनी केले.
सामुहिक पुस्तक वाचनाने के. के. घुले विद्यालयाचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने दणाणून गेला होता. विद्यार्थ्याना संस्थेच्या वतीने वाचनासाठी पाचशे पुस्तके वाटप करण्यात आले.
सतीश हाके, सुदेश काशिद, भास्कर लोमटे, निता जगताप, ओजस बेल्हेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.