Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

BJP Names Kaustubh Gawde for Pune Teachers Constituency : भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर डॉ. बी. पी. रोंगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
Pune Division Teachers Constituency

Pune Division Teachers Constituency

esakal

Updated on: 

पंढरपूर (जि. सोलापूर) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूरच्या स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावले (Pune Teachers Constituency Election) आहे. रोंगे यांच्या बंडखोरीमुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत (पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर) भाजपची मोठी कोंडी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com