Pune : पुणे - नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ अपघात;दोन ठार

दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला
Accident
Accident esakal

शिरूर : भरधाव वेगातील मद्यधुंद मोटारचालकाने दूचाकीला मागून ठोकरल्याने, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर दूचाकी आदळून झालेल्या अपघातात शिरूर मधील दोघे तरूण दोन वाहनांच्या मधे चिरडून जागीच ठार झाले. पुणे - नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ (ता. शिरूर) काल रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

नीलेश हैबती थिटे (वय २९) व शिवाजी अरूण जवळगे (वय २९, दोघे रा. प्रितम प्रकाश नगर, शिरूर) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, आज मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत थिटे यांचे मामा प्रताप बबनराव महाजन (रा. राव्हेन्यू काॅलनी, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी आज मोटारचालक विजय बाळासाहेब रानवडे (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक केली असून, शिरूर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नीलेश थिटे व शिवाजी जवळगे हे एकमेकांचे जिवलग मित्र असून, कुरिअर व इतर छोटी - मोठी कामे करीत होते. जवळगे याचे कुरिअरचे काम असल्याने काल सायंकाळी दोघे कारेगाव येथे गेले होते.

तेथील काम आटोपून ते दूचाकीवरून (क्र. एमएच १२ केई ९४६५) शिरूरला घरी येत होते. दरम्यान, न्हावरे फाट्याजवळील हॉटेल शिवनेरी समोर नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारीने (क्र. एमएच १२ एनयु ४९६५) त्यांच्या दूचाकीला मागील बाजूने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दूचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूकीच्या कंटेनरवर आदळली.

Accident
Pune Zp Villages : गावगाड्यातील विकासकामांची गती झाली मंद

त्यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघानंतर, थिटे व जवळगे यांच्या मित्रमंडळींसह प्रितम प्रकाश नगर मधील तरूणांची अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. विजय रानवडे या मद्यधुंद मोटार चालकाला पकडून तरूणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

या अपघातातील नीलेश थिटे व शिवाजी जवळगे हे शालेय जीवनापासून एकमेकांचे जीवलग मित्र असून, येथील प्रितम प्रकाश नगर मध्ये शेजारी राहण्यास होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर दोघेही एकत्र मिळून कुरिअर व इतर छोटी - मोठी कामे करीत होते.

आयुष्यभर एकत्र काम करायचे, एकत्र राहायचे असे ठरविलेल्या या मित्रांच्या जीवनाचा शेवटचा प्रवासही एकत्रच झाल्याने त्यांच्या मित्रमंडळींनी हळहळ व्यक्त केली. मृत तरूण वास्तव्यास असलेल्या प्रितम प्रकाश नगर परिसरावर दुःखाचे सावट पसरले. 'दो जिंदगी मगर एक सफर...' अशी टॅगलाईन वापरून त्यांच्या मित्रमंडळींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

Accident
Pune : ‘PMP’ला २०० कोटी रुपये द्यावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com