
पंढरपूर : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. रविवारी एक दिवसात राज्यात सरासरी १२० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसाचा पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे. या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केली.