Solapur News : अहिल्यारत्न आदर्श माता पुरस्काराने भांबुर्डीतील पुष्पा दडस यांचा सन्मान

श्रीमती दडस यांनी त्यांचे पती सतीश दडस यांना मोलाची साथ तर दिलीच, पण कुटुंबाच्या संस्कारक्षम आणि बळकट बांधणीचे केंद्रबिंदू झाल्या. संयमाच्या बळावर कुटुंबाचे उत्कृष्ट पालनपोषण केले. मुलांना उच्चशिक्षण, संस्कार व चारित्र्याचे भान देऊन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दिली.
Celebrating Motherhood: Pushpa Dadas Receives Adarsh Mata Honor
Celebrating Motherhood: Pushpa Dadas Receives Adarsh Mata HonorSakal
Updated on

निमगाव : अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय अहिल्यारत्न आदर्श माता पुरस्कार भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील पुष्पा दडस यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com