

Solapur Faces Rainfall Crisis: Nine Talukas Still Await Good Monsoon Showers
sakal
सोलापू्र : जूनमधील पावसाने दगा दिल्यानंतर जुलैमध्येही आतापर्यंतच्या पावसाने सोलापूर जिल्ह्याची घोर निराशा केली आहे. जुलैमध्ये आतापर्यंत बार्शी तालुक्यातील ६८.४ मिली मिटर व करमाळा तालुक्यातील ५०.९ मिली मिटर पाऊस वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगाम वाया गेला असून आता शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व पशुधनाच्या चाऱ्याची चिंता सतावू लागली आहे.