
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या अशा परिस्थितीत थेट नगराध्यक्ष पदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतून मिळावी, अशी मागणी माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी केले. याच नगराध्यक्ष पदाच्या जागेवर भाजपचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी भाजपचा हक्क सांगितल्यामुळे महायुतीतील घटक पक्षानेच नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष पदावर दावा केल्यामुळे नेमकी जागा कुणाला मिळणार ? याविषयी चर्चा सुरू झाल्या.