bjp flag.jpg
bjp flag.jpg

भाजप जिल्हाध्यक्षाच्या मिरवणुकीत दोन गटात राडा : पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी 

Published on

पंढरपूर (सोलापूर) ः भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे नूतन जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांच्या मिरवणूकी दरम्यान फटाके फोडण्याच्या कारणावरुन दोन गटात चाकू आणि दगडाने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नारायण चिंचोली (ता.पंढरपूर) येथे शनिवारी (ता.30) सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींनुसार 16 जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आऱोपींना अटक केली आहे. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नारायण चिंचोली येथील लक्ष्मण धनवडे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, त्यांच्या समर्थकांनीशनिवारी सायंकाळी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली.मिरवणूक दरम्यान फिर्यादी सुनिता राजेंद्र नलवडे यांच्या घरात फटाके फोडले जात होते. आमच्या घरासमोर फटाके वाजवून कचरा करु नका, पुढे चौकात वाजवा असे फिर्यादीने सांगताच संशियत आरोपी ऋीकेश मस्के, सचिन रमेश जाधव, सनी वाघ, विठ्ठल माने, नितीन जाधव, ज्ञानेश्वर मस्के,नंदाबाईमस्के, प्रज्ञा ताठे, सुप्रिया मस्के आदींनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली, यावेळी आरोपींनी धारदार चाकूने डोक्‍यात, पाठीत व छातीवर वार करुन जखमी केले. यावेळी त्यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही लंपास केले. 
याच प्रकरणीसुनिता राजू नलवाडेयांनी मिरवणूकी दरम्यान फटाके का वाजवता असे म्हणत दगडाने मारहाण करुन जखमी केले.व दीड तोळे वजणाचे सोन्याचे गंठण पळवून नेल्याची फिर्याद प्रज्ञा सोमनाथ ताटे यांनी दिली आहे. 
या प्रकरणी संशयीत आरोपी सुनितानलवडे, संकेत राजू नलवडे,निशांत राजू नलवडे, प्रशांत श्रीमंत नलवडे,आप्पा गुंड, प्रदीप लक्ष्मण कोले यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. 
याबातची माहिती अशी की, संशयीत आरोपींनी फिर्यादीस तुम्हाला जीवंत ठेवत नाही अशी धमकी देत, हातात दगड घेवून फेकून मारले, यामध्ये फिर्यादीच्या मुलीच्या कोपरलादगड लागून ती जखमी झाली आहे. याचवेळी आरोपी सुनितानलावडे हीनेदीड तोळे वजणाचेगळ्यातील गंठण हिसकावून नेल्याची फिर्यादीत म्हटले आहे. दोन गटातील वाद उफाळून आल्यानंतर पोलिसांनी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुढील तपास सहाय्यकपोलिस फौजदार अशोक जाधव हे करीत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com