Solapur News : विकासाच्या मुद्द्यावर लढविणार निवडणूक - राहुल गायकवाड

भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार मतदारसंघाचा विकास करू शकणार नाही. आपली स्पर्धा कोणाशी नाही.
rahul gaikwad
rahul gaikwadsakal

सोलापूर : भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार मतदारसंघाचा विकास करू शकणार नाही. आपली स्पर्धा कोणाशी नाही. वंचित बहुजन आघाडीची लढत तत्त्वांशी आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आणि विजयी होणार, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

श्रमिक पत्रकार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच भाजपला पराभूत करू शकते.

भाजपला पराभूत करणे हा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात मी उतरलो आहे. लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जिल्ह्याचा विकास झाला नाही. प्रशासनाची ब्ल्यू प्रिंटची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

वंचित बहुजन आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर लढणारी आहे. याच मुद्द्यावर विजयी होणार असल्याचेही राहुल गायकवाड म्हणाले. तसेच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच भाजपच्या उमेदवाराला उपरा म्हटले, परंतु त्या स्वत:तरी कुठे सोलापुरात असतात.

त्या कुठे असतात एकदा त्याची माहिती घ्यावी. काँग्रेसच्या काळात मतदारसंघात विकास केला असता तर आज ही वेळ आली नसती. सोलापुरात भाजप आणि काँग्रेस यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार एकमेकांवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून राजकारणाची पातळी लक्षात येते.

भाजप व काँग्रेसला जनता कंटाळली आहे. मतदारसंघाचा विकास करेल, असा उमेदवार जनतेला हवा आहे. वंचित बहुजन आघाडी याच तत्त्वावर निवडणूक लढवीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, प्रवक्ते एस. साळुंखे, पांडुरंग खंडेराव, प्रशांत बुनकेर, नागेश माने आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com