
सोलापूर : हुतात्मा एक्स्प्रेससह ३३ गाड्या रद्द
सोलापूर : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण दौंड येथील कुरकुंभ मोरी येथे रोड अंडरब्रीजचे (पुलाखालील रस्ता) काम हाती घेतले आहे. यामुळे १३ मे ते २९ मे दरम्यान तब्बल १७ दिवसांसाठी ३३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग आणि काही गाड्या अंशतः शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसात गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्यावतीने दौंड येथील कुरकुंभ मोरीच्या रोड अंडरब्रिजच्या कामासाठी सतरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर सेवेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. अनेक रेल्वेच्या सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गिका खुली होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अंशिक रद्द गाड्या
इंदोर-दौंड एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यत धावेल, दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यत धावेल.
हैद्राबाद-हडपसर एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकापर्यत धावेल. बेंगलोर-मुंबई उद्यान एक्स्प्रेस सोलापूर स्थानकापर्यत धावेल. नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यत धावणार आहे.
शार्ट ओरिजिनेटेड मेल एक्स्प्रेस गाड्या
दौंड-इंदौर एक्स्प्रेस ही पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहे. ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस ही
पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. तर हडपसर-हैद्राबाद एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. मुंबई-बेंगलोर उद्यान एक्स्प्रेस ही सोलापूर स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस ही कुर्डुवाडी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.
मार्ग परिवर्तन झालेल्या गाड्या
विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
काकिनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल. तिरूवनंतपुरम सेंट्रल-मुंबई एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल. पुणे-भुवनेश्वर एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल. साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल.
उशीराने धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस
मुंबई –बेंगलोर एक्स्प्रेस ही २ तास उशीराने धावेले. बेंगलोर-मुंबई एक्स्प्रेस ही १ तास १० मिनिट उशीराने धावेल. नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस ही १ तास १० मिनिटे उशीराने धावेल. नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस ही १ तास १० मिनिटे उशीराने धावेल. तिरूवनंतपुरम सेंट्रल -मुंबई एक्स्प्रेस ही १ तास १० मिनिटे उशीराने धावेल. साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस ही २ तास ३० मिनिटे उशीराने धावेल. कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस ही १ तास उशीराने धावेल. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस ही १ तास उशीराने धावेल. मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस ही ३० मिनिटे उशीराने धावेल. मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस ही २ तास उशीराने धावणार आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल
दौंड यार्डमध्ये सबवे रोड अंडरबीच बांधण्याच्या कामासाठी आतापर्यंत अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आले असून, आता पुन्हा एकदा १३ मे ते २९ मे दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल १७ दिवसांचा असणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून, वाहतुकीची देखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मेगा ब्लॉकच्यावेळी स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या वतीने वाहतुकीची पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.१
Web Title: Railway Block Hutatma Express Cancele Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..