
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक १२ व १३ च्या विस्तारीकरणासाठी १ व २ मार्च रोजी मुंबई येथे विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. याबाबतची सूचना मध्य रेल्वे प्रशासनाकडून आधीच देण्यात आली असली तरी त्यापूर्वीच तिकिटांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रविवारीदेखील दोन गाड्यांचा प्रवास मुंबईऐवजी पुण्यापासून सुरू होणार आहे.