esakal | रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात

रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
विजय थोरात

एकूण 1313.8 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या भागामध्ये विद्युतीकरणानंतर गाड्या धावण्यास सुरवात झाली आहे.

सोलापूर : मध्य रेल्वेचा (Central Railway) सोलापूर विभाग हा 1 हजार 900 किलोमीटरचा आहे. सोलापूर विभागात अंकाई ते दौंड, दौंड ते कुर्डुवाडी, कुर्डुवाडी ते मोहोळ, दुधनी ते कलबुर्गी, कलबुर्गी ते वाडी, मिरज ते पंढरपूर, पंढरपूर ते कुर्डुवाडी, दुधनी ते होटगी या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 1313.8 किमीचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तर मोहोळ ते सोलापूर या 69 किलोमीटरचे विद्युतीकरणाचे काम अपूर्ण आहे तसेच कुर्डुवाडी ते लातूर या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. एकूण 1313.8 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या भागामध्ये विद्युतीकरणानंतर गाड्या धावण्यास सुरवात झाली असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Railway electrification work in Solapur division is in the final stage-ssd73)

हेही वाचा: श्रेयवादासाठी आमदार शिंदेंचा खोटारडेपणा - माजी आमदार नारायण पाटील

कोरोना (Covid-19) प्रादुर्भावामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे विभागातील विद्युतीकरणाच्या कामाला गती मिळत आहे. त्यामुळे विभागातील दुहेरीकरण आणि विद्युतीकरण हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आनंदी व सुखकर व्हावा यासाठी विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासन काम देखील करीत आहे. काही दिवसांपूर्वी दुधनी ते होटगी दरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (Railway Safety Commissioner) पाहणी देखील करण्यात आली. मोहोळ ते सोलापूर येथील रुळाच्या बाजूला विद्युतीकरणाचे काम उभे करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. कुर्डुवाडी ते लातूर या मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने देखील वेग घेतला आहे. विद्युतीकरणानंतर गाड्या धावण्यास लवकरच सुरवात होणार असल्याने जलद गतीने प्रवास होण्यास मदत होणार आहे. मात्र, मोहोळ ते सोलापूर या 69 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण राहिले असून, लवकरच हे काम देखील पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: पोलिसांनी लावला अवघ्या सात दिवसांत दरोड्यातील आरोपींचा छडा !

सोलापूर विभागातील लोहमार्ग

 • अंकाई ते दौंड 326.6 कि.मी.

 • दौंड ते कुर्डुवाडी 243 कि.मी.

 • कुर्डुवाडी ते मोहोळ 108.4 कि.मी.

 • कलबुर्गी ते ताज सुल्तानपूर 19 कि.मी.

 • दुधनी ते कलबुर्गी 114.0 कि.मी.

 • कलबुर्गी ते वाडी 157.0 कि.मी.

 • मिरज ते पंढरपूर 153.3 कि.मी

 • पंढरपूर ते कुर्डुवाडी 53.6 कि.मी.

 • दुधनी ते होटगी 141.988 कि.मी.

आकडे बोलतात...

सोलापूर रेल्वे स्थानक

 • फलाटांची संख्या 5

 • थांबणाऱ्या गाड्यांची संख्या - 98

 • सोलापूर रेल्वे स्थानकावरून तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या - 20 हजार

 • सोलापूर रेल्वे स्थानकाचे सरासरी दररोजचे उत्पन्न - 30 लाख रुपये

loading image