सोलापूरकरांच्या पुणे- मुंबई प्रवासाची चिंता दूर! अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway
सोलापूरकरांच्या पुणे- मुंबई प्रवासाची चिंता दूर! अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’

सोलापूरकरांच्या पुणे- मुंबई प्रवासाची चिंता दूर! अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’

सोलापूर : कोरोनामुळे तब्बल अडीच वर्षे जागेवरच थांबलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१६९-१२१७०)सोमवार (ता. १८) जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. पुणे, मुंबईकडे दररोज ये-जा करणाऱ्या सोलापूरमधील चाकरमान्यासाठी ही गाडी अत्यंत महत्वाची मानली जाते. ही रेल्वे सुरु होणार असल्याने सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांसह, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुंबई, पुण्याहून सोलापूरला वेळेत येता येणार आहे.

सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वाशिंबे-भाळवणी २७ किलोमीटरच्या दुहेरीकण, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम देखील येत्या १८ ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू व्हावी यासाठी प्रवासी आणि प्रवासी संटनाकडून सातत्याने मागणी केली जात होती, अखेर या मागणीला यश आले आहे. या गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते.

हुतात्मा, उद्याननंतर ‘इंद्रायणी’चा सुलभ पर्याय

सकाळी ६.३० वाजता हुतात्मा एक्स्प्रेस तर सकाळी ११ वाजता उद्यान एक्स्प्रेसनंतर इंद्रायणी हा सुलभ पर्याय असल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. इंद्रायणी एक्स्प्रेस दुपारी पुणे येथून सोलापूरला १.२५ वाजता पोहचते तर दुपारी २ वाजता सोलापूर स्थानकावरून मुंबईकडे रवाना होते. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेसने अनेकांचा प्रवास सुलभ होतो.

इंद्रायणी एक्स्प्रेसला हे असणार थांबे

इंद्रायणी एक्स्प्रेसला पुणे, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी या भागातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची ठरली आहे. त्यामुळेच तिला सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. एकूण १६ डब्यांची ही गाडी असून, आरामदायी आसन व्यवस्था, बायो टॉयलेट्स, जार्जिंग व्यवस्था, सामान ठेवण्यास मोठी जागा या सुविधा नव्या एलएचबी कोचमध्ये देण्यात आले आहेत.

प्रवाशांची या गाडीचा लाभ घ्यावा

सोमवार येत्या १८ जुलैपासून इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू होत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ही गाडी कोरोनानंतर पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे. तरी प्रवाशांची या गाडीचा लाभ घ्यावा.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

Web Title: Railways Indrayani Express To Run After Two And A Half

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top