
सोलापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींचा विसर ; रेल्वे
सोलापूर : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना वर्षानुवर्षे तिकीटामध्ये सूट मिळत होती. ही सूट कोरोना काळात मागील दोन वर्षापासून बंद आहे. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर रेल्वेने जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत मात्र अद्यापही सुरू केली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सवलत त्वरित सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
कोरोना महामारीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत मिळत होती. मात्र कोरोनामध्ये ही सवलत बंद करण्यात आली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, नियमित रेल्वेगाड्याही सुरू झाल्या आहेत. असे असतानाही ज्येष्ठ नागरिकांना सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. रेल्वेची सवलत घेणारा मध्यमवर्ग आहे. त्यांना रेल्वेचा महागडा प्रवास परवडण्यासारखा नाही. त्यामुळे प्रवासी सवलत सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रेल्वे प्रशासनावर राेष
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये साठ वर्ष वयाच्यावर असलेल्या नागरिकांना ४० टक्केपर्यंत मिळत होती. तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना ५० टक्के सूट अनेक वर्षांपासून मिळत होती. परंतु कोरोना काळापासून ही सवलत बंद करण्यात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.
Web Title: Railways Solapur Forgetting Senior Citizen
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..