
वैराग : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी ता. २४ जून रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बार्शी तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मात्र, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध वाढतच असून २६ जून रोजी माजी खासदार राजू शेट्टी हे शक्तिपीठाला विरोध दर्शनासाठी आंबेगाव येथे उपस्थित होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.