
Former Mohol MLAs Rajan Patil and Yashwant Mane spark political buzz, with BJP speculation trending on social media.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमी वर ते भाजपा जाणार का? या चर्चेला उधाण आले असून, पाटील यांच्या चिरंजीवांनी सोशल माध्यमावर केलेली पोस्ट व त्या खालील कमेंट्स पाहता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेत तथ्य असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसा पूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी "माझे जो काम करेल त्याच्या सोबत मी जाणार" या त्यांच्या वक्तव्याची प्रचिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भाजपाची सुभेदारी किंवा त्यांची शिस्त राजन पाटील यांच्या पचनी पडणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.