esakal | बा... विठ्ठला उद्धव ठाकरेंना सुबुद्धी दे : राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty criticizes Uddhav Thackeray

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून त्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, एफआरपीची थकीत रक्कम त्वरीत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानी शेतकरी संघनटेच्या वतीने येथील संत नामदेव पायरीवजळ सरकार विरोधात आंदोलन केले.

बा... विठ्ठला उद्धव ठाकरेंना सुबुद्धी दे : राजू शेट्टी

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करुन त्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वानावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. सरकार सत्तेवर येवून 50 दिवस उलटून गेले, तरी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. बा.. विठ्ठल उध्दव ठाकरे सरकारला आता तरी शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याची सुबुध्दी दे... असं आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी विठ्ठलाला साकडं घातले.

शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यां ठाकरे सरकारला आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून त्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, एफआरपीची थकीत रक्कम त्वरीत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानी शेतकरी संघनटेच्या वतीने येथील संत नामदेव पायरीवजळ सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी शेट्टी यांनी ठाकरे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टिकास्त्र सोडले. राज्यातील सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज ठाकरे जर शॅडो कॅबिनेट सारखी संकल्पना राबवत असती तर त्यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, नवनाथ माने, समाधान फाटे, अतुल कारंडे,रणजित बागल, विष्णूपंत बागल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदाभाऊ खोत फालतू माणूस....
सदाभाऊ खोत यांची सांगली जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडी घोटयाळा प्रकरणी ईडी मार्फत स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र,कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यातील हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. यातून एका शेतकर्यांने आत्महत्या केल्याचे ही समोर आले आहे. या प्रकरणी सरकाने गंभीर दखल घ्यावी. सदाभाऊ खोत हे केवळ सत्तेसाठी लाचार झाले आहेत. त्यांनी केलेली टीका मी फारसी मनावर घेत नाही. तो माणूस नसता फालतू असल्याचेही यावेळी शेट्टींनी सांगितले.