
-राजकुमार शहा
मोहोळ : येत्या अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे, मंत्री परिषदेची बैठक ही चौंडीला घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून त्यांनी ती तात्काळ मान्य केली आहे. 1947 नंतर अशा बैठकीचे आयोजन पहिल्यांदाच होत आहे. त्या ठिकाणी विशेष घोषणाही होणार आहे. दिलेल्या संधीचे सोने करेन, मी सभापती झाल्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.मात्र अनेक माणसे खोड्या करून नको तिथे आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करतात असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केले.