
सोलापूर : राज्य सरकारने रमाई आवास योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्याला अडीच हजारांहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयास जिल्ह्यातून केवळ ६७० पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ १९ दिवस उरले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्तीसाठी समाज कल्याण विभागाची धावपळ सुरू झाली आहे.