
पंढरपूर : भारत विरुद्ध पाकिस्तानचे क्रिकेट सामने झाले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात खेळले पाहिजे. खेळामध्ये राजकारण आणू नये. पूर्वी विरोध होत होता. मात्र तो आता बंद झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केली आहे.