

Appointment of Rameshwar Masal as NCP Election Incharge
Sakal
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या तीन तालुक्याच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने रामेश्वर मासाळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले.