

‘Granth Sanjeevani’ Initiative Brings Historic Books to Digital Platform
sakal
-अरविंद मोटे
सोलापूर : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांच्याकडील प्राचीन ग्रंथांत दडलेला ज्ञानठेवा आता राज्यभरातील संशोधक व वाचकांना खुला होणार आहे. या संस्थेकडील ३१ हजार दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखित ग्रंथ ‘ग्रंथ संजीवनी’ पोर्टलद्वारे राज्यभरातील ग्रंथालयांत ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जुनी वर्तमानपत्रे, नकाशे, जर्नल्स, सरकारी प्रकाशने आणि अहवाल यांचाही यामध्ये समावेश आहे.