esakal | अबब.., ! रिडिंग शुन्य अन वीज बिल दिले तीन लाख चाळीस हजार रुपयाचे, वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

light bill.jpg

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने कुंभारी येथील कॉ गोदूताई परुळेकर नगर येथे सरसकट वीज बिल माफ करा ही प्रमुख मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव अँड एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयास घेराव घालण्यात आला. 

अबब.., ! रिडिंग शुन्य अन वीज बिल दिले तीन लाख चाळीस हजार रुपयाचे, वाचा सविस्तर 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूरः वीज मिटरवर रिडींग शुन्य असताना वीज ग्राहकाला चक्क तीन लाख चाळीस हजार रुपयांचे विजबिल आकारल्याचा प्रकार सोलापूर शहरात उघडकीस आला. वीज बिलाच्या संदर्भात झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी पुराव्यासह हा प्रकार महावितरणच्या अधिकाऱ्यासमोर मांडला. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामीण मध्ये 281 नविन कोरोना बाधित रुग्ण 

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने कुंभारी येथील कॉ गोदूताई परुळेकर नगर येथे सरसकट वीज बिल माफ करा ही प्रमुख मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव अँड एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयास घेराव घालण्यात आला. 
यावेळी शिष्टमंडळामार्फत सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, सिद्धपा कलशेट्टी,कुरमय्या म्हेत्रे, फातिमा बेग, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी,बापू साबळे, हसन शेख,दत्ता चव्हाण,आरिफा शेख, कलावती चिप्पा आदींनी कार्यकारी अभियंता श्री. ए.पी.ओहाळे यांना निवेदन देऊन वीजबिल माफ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सोमवारी (ता.24) रोजी निर्णय घेण्यासंबंधी सिटू च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. 

हेही वाचाः म्हैसाळ पाणी पाणी मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार कोण म्हणाले ? ते वाचा 

मौजे कुंभारी हद्दीत विडी कामगार महिलांनी कॉ. गोदुताई परुळेकर नगर विडी कामगारांची वसाहत उभी केली आहे. या वसाहतीतील विडी कामगारांना वीज वितरण विभागाने सवलतीच्या दारात वीज जोडणी दिली आहे.कॉ. गोदुताई परुळेकर विडी घरकुल परिसरातील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने महिन्याचे वाढीव वीजबील एकत्रित दिले आहे. भरमसाठ रकमेचे वीज बिल भरणे हातावरील पोट असलेल्या महिला विडी कामगारांना शक्‍य नाही. 
822 विद्युत फॉल्टी मीटर बदलण्यात यावे. अंदाजित वीज बिले देणे बंद करावे. या भागात 11 हजार विद्युत ग्राहक असल्याने स्वतंत्र शाखा कार्यालय सुरु करावे. ए.बी. स्विच बसवण्यात यावे. विद्युत मीटरची तपासणी करून तांत्रिक अडचणी दूर करण्यात यावे. उभे केलेल्या विद्युत खांबावर विद्युत तारा ओढाव्यात. ग्राहकांची संख्या लक्षात घेता विद्युत ट्रान्सफार्मर बसवावेत. कायम स्वरूपी तक्रार निवारण कक्ष सुरु करून कर्मचारी नेमण्यात यावा. नवीन विद्युत ग्राहकांना े नवीन जोडणी द्यावी. सौभाग्य योजनेमध्ये वीजबिले दुरुस्त करून द्यावीत. यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडला. यावेळी युसूफ मेजर, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा कलशेट्टी, फातिमा बेग,आरिफा शेख मुरलीधर सुंचू ,अनिल वासम हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सिद्धपा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, अँड एम.एच.शेख आदींनी सभेला संबोधले. सूत्रसंचालन बापू साबळे यांनी केले.  

 
 

loading image
go to top