Solapur Accident: 'चारचाकीच्या धडकेत एक ठार, एक जखमी'; चारचाकी वाहनाची दुचाकीला मागून जोरदार धडक
Fatal Road Accident: अपघातात अंकुश ऊर्फ बळी मनोहर शिंदे (वय ३४, रा.सत्तरधरवाडी,ता.औसा) यांचा मृत्यू झाला असून, चंद्रकांत नारायण ढवळे (वय ४०, रा.वाडवण, ता.उदगीर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पांगरी : कुर्डुवाडीकडून बार्शीकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता.१४) सायंकाळी सुमारे पाच वाजता खांडवी (ता. बार्शी) हद्दीतील वैशाली हॉटेलजवळ घडली.