

One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
sakal
सोलापूर: एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीवर भररस्त्यात गळ्यावर व पाठीवर चाकूने हल्ला करून खून करण्यात आला. या हल्ल्यात एकजण जखमी झाला. शुक्रवारी (ता. १९) रात्री दहाच्या सुमारास अक्कलकोट रस्त्यावरील सुनील नगरातील केविल कंपनीसमोर ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोरास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.