esakal | परराज्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पाच ट्रेनचे संमतीपत्र अप्राप्त
sakal

बोलून बातमी शोधा

railway

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन आज जाहीर झाला असून महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

परराज्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पाच ट्रेनचे संमतीपत्र अप्राप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन आज जाहीर झाला असून महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच ट्रेनला अद्यापही संबंधित राज्याने संमती न दिल्याने या ट्रेन निघणार कधी? याचा मुहूर्त 16 मे पर्यंत निश्चित झालेला नव्हता. सोलापूर येथून लखनऊ साठी 1238 कामगारांना घेऊन ट्रेन जाणार आहे. पंढरपूर येथून पटना येथे 1376 कामगारांना घेऊन ट्रेन जाणार आहे. पंढरपूर येथून लखनऊसाठी तेराशे 61 कामगारांची ट्रेन नियोजित करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील हावडा येथे सोलापुरातून 1486 कामगारांना घेऊन ट्रेन रवाना होणार आहे. झारखंड राज्यातील रांची येथे पंढरपुरातून तेराशे 23 कर्मचाऱ्यांना कामगारांना घेऊन ही ट्रेन रवाना होणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. हे कामगार ज्या राज्यात जाणार आहेत त्या राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला असून त्यांचे संमती पत्र मिळाल्यानंतर या ट्रेन सोडण्यात येणार असल्याचेही उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. 
 
आकडे बोलतात
- आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी अर्ज प्राप्त : 41 हजार 598
- रवाना झालेल्या व्यक्ती - 27 हजार 953 
- शिल्लक व्यक्ती : 13 हजार 645

आंतरराज्य महाराष्ट्रातून आणि राज्याकडे जाणारे प्रवासी
- प्राप्त अर्ज : 32 हजार 129
- रवाना झालेल्या व्यक्ती : 8 हजार 165 शिल्लक व्यक्ती : 23964 
(स्थिती16 मे 2020 पर्यंतची) 

प्रशासनाकडून कार्यवाही
लॉकडाऊन कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार, धार्मिक यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने कार्यवाही केली जात आहे. हे व्यक्ती ज्या राज्यात जाणार आहेत त्या राज्यातून संमती पत्र मिळाल्यानंतर येथील व्यक्तींना त्यांच्या राज्यात सोडले जाते.
-  दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

loading image
go to top