
सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनीही पहिले गणवेश मिळाले नव्हते. आता प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही सर्व शाळांपर्यंत दुसरे गणवेश पोचू शकले नाही. मात्र, गणवेश तयार असून या दोन दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.