प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांनी संतभूमीचा लौकिक वाढविला

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगरपालिकेच्या वतीने दामाजी चौकात 'मंगळवेढे भुमी संतांची' या फ्लेक्समुळे दामाजी चौकाला देखणे स्वरूप प्राप्त झाले
Santbhumi
Santbhumisakal

मंगळवेढा : माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगरपालिकेच्या वतीने दामाजी चौकात 'मंगळवेढे भुमी संतांची' या फ्लेक्समुळे दामाजी चौकाला देखणे स्वरूप प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांनी सेल्फी व स्टेट्स ठेवून संतभूमीचा लौकिक वाढविला.

Santbhumi
रत्नागिरी : विक्रांत जाधवांची खंत; संस्कृती जपून पर्यटन विकास करण्याचे आवाहन

टेभूर्णी विजयपूर हा पालखी महामार्ग शहरातून गेल्यामुळे या मार्गावर विशेषता पंढरपूर रोडवर शहरातील व्यापाऱ्यांना नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.असताना शहरात संतसृष्टी पाहण्यास येणाय्रा भाविकांना मंगळवेढे भूमी संतांची ही प्लेक्स दर्शनीय केली. भविष्याचे ठिकाण सेल्फी पॉइंट म्हणून नावारूपास येणार आहे.शहरातील नव्या प्रास्तावीत चार पुतळ्यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने नगरपालिकेने चोखामेळा चौकातील शॉपिंग सेंटरच्या दोन मजली इमारतीच्या उत्तरेकडील बाजूस स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या महान व्यक्तींचे भिंतीवर चित्र रेखाटले आहे.

Santbhumi
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

याच अभियानांतर्गत नगरपालिकेने शहरात नागरी दलाची स्थापना केली असून यामध्ये पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांचा समावेश केला आहे त्यामुळे पालिकेतील विविध उपक्रमाची माहिती त्या व्यापाऱ्यांना मोबाईल फोनद्वारे सहज रित्या उपलब्ध होणार आहे त्यामध्ये शासनाच्या वतीने राबविण्यात जाणारे उपक्रम, लसीकरण, नगरपालिकेचे कर आकारणी व विविध अनपेक्षित घटनांची माहिती या मोबाईलद्वारे व्यापाऱ्यांना समजणे सहज शक्य होणार आहे स्वतंत्र आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तहसील कार्यालय व नगरपालिकेत आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com